श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ACGL Spinners येथे औद्योगिक क्षेत्र भेट

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ACGL Spinners येथे औद्योगिक क्षेत्र भेट

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी तसेच पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळावी या उद्देशाने स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दर्यापूर रोड, अकोट, येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ACGL Spinners Pvt. Ltd., पोपटखेड रोड, अकोट येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान ACGL Spinners Pvt. Ltd. चे भागीदार श्री.नितीनजी अग्रवाल तसेच कंपनीचे कर्मचारी श्री.पाटील साहेब व श्री.शेख साहेब यांनी कापसाची निवड व खरेदी, कापसावरील प्राथमिक प्रक्रिया, त्यातील अशुद्ध घटक वेगळे करणे, कापसापासून धागा तयार करणे अशा विविध टप्प्यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कच्च्या मालापासून तयार उत्पादनापर्यंतची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी तसेच वस्त्रोद्योगाचे महत्त्व, उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्पे, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज यांविषयी माहिती विद्यार्थ्यांना या भेटीतून मिळाली. औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व समजून घेण्यासही मदत झाली. प्रत्यक्ष उद्योगाला भेट दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून, त्यांच्या शैक्षणिक अनुभवाला व्यावहारिक दृष्टिकोनाची जोड मिळाली.
या भेटी दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पट्टेबहादूर, प्रा.मेतकर, प्रा.अवचट, प्रा.राऊत, प्रा.भिसे, प्रा.चुने, प्रा.पाटील, प्रा.पुंडकर मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *