
घरकुलच्या अनुदानापासून पात्र लाभार्थी वंचित! तात्काळ अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी जाधव यांची मागणी,
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव),
दि१५ मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी शासनाच्या घरकुलाच्या मिळणाऱ्या अनुदानापासून बऱ्याच दिवसापासून वंचित असल्याचे चित्र दिसत असून अनुदान मिळावे याकरिता पंचायत समितीमध्ये पात्र लाभार्थी संबंधित विभागात चक्रा मारत असताना पाहण्यास मिळत आहे तेव्हा गट विकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून अनुदान पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी , ऑफिसमध्ये गट विकास अधिकारी यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ऑनलाइन मिटिंग, व्हीसी चालू आहे असे सांगण्यात आले तेव्हा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करून मागणी केली, मालेगाव पंचायत समिती अंतर्गत रमाई ,शबरी तसेच मोदी आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी पात्र असताना त्यांना दुसरा,तिसरा व चौथा, हप्ता घरकुलाचा त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हे लाभार्थी पंचायत समिती चक्रा मारत असताना दिसत आहेत याबाबत जाधव यांनी चौकशी केली असता, ज्या लाभार्थ्यांचे बँकेचे खाते नॅशन लाईज, सरकारी बँकेत आहेत अशांना अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत असे सांगण्यात येते तर ज्या लाभार्थ्यांची खाते जिल्हा सहकारी बँकेचे आहेत अशांना वरूनच अडचण असल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही हा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रातच असल्याचे सांगून आम्ही शासनाकडे याबाबत कळवले असल्याने सांगितले, आमच्या हाती काही नाही असं म्हणतात, लोकांनी कर्ज तसेच उसनवारी करून घरकुलाचे काम पूर्ण केले असून आता दसरा दिवाळी येत असल्याने पहिलेच दुष्काळ असल्याने यांना यांचे घरकुलाचे राहिलेले हप्ते तात्काळ टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे
