सहा महिने उलटले.आश्वासनांचा गाजावाजा,पण समस्या ‘जैसे थे आढावा बैठकीत नागरिकांचा संतप्त सवाल…

सहा महिने उलटले.आश्वासनांचा गाजावाजा,पण समस्या ‘जैसे थे आढावा बैठकीत नागरिकांचा संतप्त सवाल…

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,१७:- मालेगाव नगरपंचायतीत सन्माननीय अपराजित खासदार तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नागरी समस्यांच्या आढावा बैठकीत शहरातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर प्रलंबित प्रश्नांचा पाढाच वाचला बैठकीत विविध भागांतील नागरिकांनी लेखी निवेदने सादर करून शहरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले सामाजिक कार्यकर्ते अजय उत्तमराव घुगे यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनात नमूद केले की,मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीला जवळपास सहा महिने पूर्ण होत आले आहेत; मात्र शहरातील एकाही प्रमुख नागरी समस्येचे समाधान झालेले नाही निवडणुकीनंतर केवळ गाजावाजा,ढोल-ताशे आणि प्रसिद्धी करण्यात आली स्वच्छता अभियानही केवळ एका दिवसापुरतेच राबविण्यात आले त्यानंतर शहरातील स्वच्छता,कचरा व्यवस्थापन,रस्ते,नाले,वाहतूक,अतिक्रमण आणि सार्वजनिक सुविधांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले की,या तक्रारीत शहरातील गांधी चौकासह विविध ठिकाणी साचणारा कचरा,पोलीस स्टेशनसमोरील हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे प्रवासी निवाऱ्यासमोरील अतिक्रमण,बॅनरबाजी व बेकायदेशीर पार्किंग,अकोला फाटा रोडवरील उघड्यावर धार धार शस्त्राने सुरू असलेली मास विक्री,वाहतूक कोंडी,आठवडी बाजारातील अस्वच्छता व व्यापाऱ्यांच्या गैरसोयी,व व्यापारा कडून आव्वाच्या सव्वा वसुली,सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था,त्या ठिकाणी एकही सफाईगार नाही,बंद पडलेले पथदिवे,रस्ते व नाल्यांची दुरवस्था आदी प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली बैठकीत उपस्थित इतर नागरिकांनीही आपापल्या परिसरातील विविध समस्या लेखी स्वरूपात मांडत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली यावेळी आमदार भावनाताई गवळी यांनी सर्व लेखी निवेदने स्वीकारून नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील,संबंधित विभागांकडून तातडीने अहवाल मागवून प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन दिले तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरावे,नागरिकांना वारंवार तक्रारी करण्याची वेळ येऊ नये,अशा सूचनाही त्यांनी दिल्या आढावा बैठकीत नागरिकांनी स्पष्ट शब्दांत मांडलेला संदेश एकच होता आता आश्वासनांचा गाजावाजा नको,तर प्रत्यक्ष विकास आणि कामांची अंमलबजावणी हवी.बॉक्स… मालेगाव शहरातील सहा महिने आधी शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभात सन्माननीय आमदार भावनाताई गवळी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या होत्या की, “प्रत्येक नगरसेवकाने दररोज आपल्या प्रभागात जावे,नागरिकांशी संवाद साधावा,स्वतचे चेहरे प्रभागात दाखवावेत,त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात.” मात्र,या सूचनांचे पालन प्रत्यक्षात होताना दिसत नसून अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक नियमित फिरकत नसल्याची खंतही सामाजिक नागरिकाकडून व्यक्त करण्यात आले.

One thought on “सहा महिने उलटले.आश्वासनांचा गाजावाजा,पण समस्या ‘जैसे थे आढावा बैठकीत नागरिकांचा संतप्त सवाल…

  1. सरकारचा निधीची वाट न पहाता थकीत कर वसुली करुन नगर पंचायतने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे! कदाचित काही प्रमुख समस्या सुटतील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *