अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते सुजाता सरकटे चा सत्कार

अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते सुजाता सरकटे चा सत्कार

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

तालुक्यातील झोडगा खुर्द येथील सुजाता सरकटे हि नवोदयच्या परीक्षेत मागासवर्गीय मुली मधून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता,आज ८ मे रोजी मालेगाव तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले होते, तेंव्हा वाशिम जिल्हाचे अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते सुजाता बबन सरकटे या मुलीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी मालेगाव चे तहसीलदार दीपक पुंडे नगराध्यक्ष ओम खुरसुडे , उपनगराध्यक्ष खवले मॅडम, अकोला वाशी जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक अनिल जाधव, ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख विवेक गवळी, मंगेश गवळी अध्यक्ष बजरंग दल मालेगाव तालुका, महसूल अधिकारी जगन महाले यांची प्रमुख उपस्थिती

लाभली होती, सुजाता सरकटे छोट्याशा खेड्यातील झोडगा येथील रहिवासी असून तिला नवोदय च्या परीक्षेसाठी वर्ग शिक्षक विकास वाझुळकर सर ने एक्स्ट्रा क्लास घेऊन शिकवण अभ्यास करून घेतला, तसेच या सरानी ज्ञानेश्वरी कैलास भिवरकर या मुलीचा देखील चांगला अभ्यास करून घेतला व ती शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन सीबीएससी , लोणावळा येथे चांगल्या शाळेत नंबर लागल्याने विकास सरचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे,

One thought on “अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते सुजाता सरकटे चा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *