मालेगांव ते शेगाव पायदळ वारी सोमवारी निघणार

मालेगांव ते शेगाव पायदळ वारी सोमवारी निघणार

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

प्रतिनिधी,दि,१५ :-मालेगाव शहरातुन दि,१७ आगस्ट रोज सोमवार ला सकाळी ७ वाजता शेगाव वारी, पायदळ दिंडी सोहळा संत गजानन महाराज संस्थान शेगाव साठी निघणार असून, या पायदळ वारी चे हे १० वे वर्ष आहे या वारी मध्ये मालेगाव सह, अमानी,डही,वांरगी, पांगरी कुटे , व इतर ठिकाणी चे भाविकांनचा सहभाग असतो जवळपास ६० ते ७० जन या वारीत असतात, मालेगाव येथील व्यापारी सतु मुंदडा (पळसिकर )यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निवासस्थान जवळ संत गजानन महाराज यांच्या फोटो चे पुजा आरती करून सकाळी ७ वाजता १७ आगस्ट ला ही पायदळ वारी काढण्यात येणार असून शेगाव येथे १९ आगस्ट रोज बुधवारी पोहचणार असुन संत गजानन महाराज संस्थान ची पालखी सोहळा हा पंढरपूर कडे गेलेला सोहळा हा शेगाव नगरीत १९ आगस्ट लाच येणार असल्याने या वारीतल सहभागी भाविकांनचे दर्शनाचे योग येणार आहे , या शेगाव वारीतील भाविकांन साठी इरळा येथे उपसरपंच महादेव वानखेडे,तर रिधोरा येथे जिल्हा परिषद सदस्य शाम बडे,तर मेडशी येथे यांच्या वतीने फराळाची व चहापाण्याची व्यवस्था करण्यात येते तसेच पहिल्या मुकाम पातुर ठिकाणी गणेश भाऊ ठाकुर यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था आहे, दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी वाडेगांव ला अमोल फाळके सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून जेवन व रात्री बाळापूर मुक्काम ठीकानी, मालेगाव येथील युवराज फैशन रेडिमेड चे मालक अनुप जयस्वाल यांच्या वतीने जेननाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी जवळा येथे मालेगाव चे डॉ. बीश्वजित हवलादार यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे माहिती वारीतील भाविकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *