स्वखर्चाने थंडपिण्याच्या पाण्यासाठी वाटर फिल्टर व कुलर लावून दिले सोबतच बोअरचे पाणी वाटप

स्वखर्चाने थंडपिण्याच्या पाण्यासाठी वाटर फिल्टर व कुलर लावून दिले. सोबतच बोअरचे पाणी वाटप

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )

सध्या ठीक ठिकाणी सामान्य जनता पाणी टंचाईमुळे त्रस्त झाल्याचे जिकडे तिकडे पाहायला मिळते. पाण्याची शोधा शोध करावी लागत आहे. अशातच शिरपूर येथील किराणा दुकानदार छोटू उर्फ नारायण दत्तराव देशमुख यांनी एक लाख रुपयांहून अधिक खर्च करून लोकांना शुद्ध व थंडपिण्याच्या पाण्यासाठी वाटर फिल्टर व कुलर लावून दिले. सोबतच बोअरच्या माध्यमातून परिसरातील पाणी टंचाई ग्रस्तांना वितरण करण्याचे समाज कार्य करीत आहेत. पाण्यासाठी लोकांची वणवण होत असल्याचे चित्र जवळपास सगळीकडे दिसून येते आहे. त्याला शिरपूर सुद्धा अपवाद नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी झाल्याने शिरपूर येथे पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या चार दिवसा ऐवजी आता दहा ते बारा दिवस लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.अशातच उधारी बंद किराणा दुकान चे मालक छोटू उर्फ नारायण दत्तराव देशमुख यांनी उन्हाळ्यात सामान्य माणसासाठी थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून एक लाख रुपयाहून अधिक स्व खर्च करून पाणी उपलब्ध करून दिले. त्यांनी आपल्या दुकानासमोर बोअर खोदून तेथे वाटर फिल्टर वॉटर कुलर लावले. या थंडगार पाण्यामुळे दररोज हजारो लोकांची तहान भागविली जात आहे. तसेच परिसरातील लोकांचे जल स्तोत्र आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी वितरण केले जात आहे.छोटू देशमुख यांच्या पुढाकाराचे गावामध्ये कौतुक केले जात आहे. पूर्ण गावाची जरी नाही तरी काही लोकांची पाणीटंचाई छोटू देशमुख यांच्या माध्यमातून दूर झाली आहे. पिण्याचे थंड व शुद्ध पाणी नियमित शालेय विद्यार्थी व जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा मागील काही वर्षांपासून होती. इतक्यातच घेतलेल्या बोअरला चांगले पाणी लागल्याने ही इच्छा पूर्ण होऊ शकली याचे समाधान वाटत असल्याचे छोटू देशमुख यांनी म्हटले.

One thought on “स्वखर्चाने थंडपिण्याच्या पाण्यासाठी वाटर फिल्टर व कुलर लावून दिले सोबतच बोअरचे पाणी वाटप

  1. सामान्य कुटुंबातील छोटु देशमुख हे सामाजिक दायित्व निभावत आहेत.निशचितच ज्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्यांनी असे उपक्रम राबविले पाहिजेत! धन्यवाद छोटु भाऊ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *