
सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींची विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर झेप
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग स्तर शालेय स्पर्धा दिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे पार पडल्या या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या 17 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत दणदणीत विजय मिळवला.हा मुलींचा संघ राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे .या संघात वेदिका जायले ,सेजल शिंदे, समृद्धी डिक्कर, माऊली वानखडे, अक्षरा चोटमल, कादंबरी पर्वतकार, राधिका येऊल ,आर्या वाळके ,अनुजा हरणे, आनंदी जवंजाळ, जीविका वानरे ,सृष्टी अघडते, भाग्यश्री ढेपे, ईश्वरी खांडेकर ,मनस्वी निमकर, प्रियांशी चव्हाण या विद्यार्थिनींचा समावेश आहे.या सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी बजावत नेत्रदीपक यश मिळवून राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत स्थान मिळवले आहे.तसेच विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विभागीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात सोहम वानखडे यांनी 98 केजी कॅटेगिरी व श्रीजीत देशमुख यांनी 56 केजी कॅटेगिरी या भारोत्तोलनामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत कांस्यपदक पटकावले आहे.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लूनकरणजी डागा , सचिव प्रमोद चांडक ,शारदा लखोटिया, रेखा चांडक, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, प्रभुदासजी नाथे, पर्यवेक्षक नितीन गावंडे ,मालती महल्ले सुचिता गायकवाड, वैशाली गावत्रे तसेच शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे.त्यांना अभिलाष काळमेघ ,प्रणव देंडव, नारायण वानखडे, संगीता सुरळकर, सुजल काळबोंडे, स्नेहा टोबरे या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
