तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिक नुकसानीची पाहणी

तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिक नुकसानीची पाहणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी १३ सप्टेंबर रोजी मालेगाव व मौजे नांगरतास येथील शेतशिवारात सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. गेल्या महिना सव्वा महिन्यात दिर्घकाळ खंड पडलेला पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम, नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार दीपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्यासह मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, नागरतास येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

One thought on “तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिक नुकसानीची पाहणी

  1. पिकाचे नुकसान तर झालेच परंतु योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही तर पुढील पावसाळ्या पर्यंत भयानक पाणीटंचाई निर्माण होईल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *