आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न

आनंद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न

वरोरा तालुका प्रतिनिधी

आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन, वरोरा येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे होते. प्रमुख वक्ते डॉ. संजय साबळे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. गोपाल वरूटकर, पर्यवेक्षक प्रा. अनिल तरोळे आणि प्रा. निलेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. अनिल तरोळे यांनी केले. त्यांनी पालक-शिक्षक संघाची भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक व शिक्षकांनी परस्पर सहकार्याने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.यानंतर पालक-शिक्षक संघाच्या मागील वर्षाचा अहवाल वाचन माजी सचिव प्रा. नीरज आत्राम यांनी सादर केला. मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालक-शिक्षक संवादाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.यानंतर सभेदरम्यान पालक-शिक्षक संघाची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी परमानंद तिराणिक यांची, तर सहसचिवपदी पुरुषोत्तम निखाडे यांची निवड करण्यात आली.” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी पालक-शिक्षक संघाची भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. संजय साबळे ग्रंथापाल यांनी पालक-शिक्षक संघ हा केवळ बैठका घेण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रभावी व्यासपीठ ठरला पाहिजे, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी नियमित संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच त्यांच्यात संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे शिक्षणव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीची नियमित माहिती घ्यावी आणि शिक्षकांशी सकारात्मक संवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाच्या विकासात पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपप्राचार्य डॉ. गोपाल वरूटकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामार्फत विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास त्यांना निश्चितच चांगले मार्गदर्शन मिळेल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे त्यांनी नमूद केले. पालकांमधून परमानंद तिराणिक, पुरुषोत्तम निखाडे,सूर्यकुमार गावंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या खालील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम, द्वितीय आलेला तन्मय ए.सातपुते,प्रीतम य.राऊत वाणिज्य मराठी शाखेतून सुरज सं. फुलारे,सुहाग बा.चौधरी वाणिज्य इंग्रजी माध्यमातून कु. गुंजन पि.ओझाविनायक जी.कोटूरवार कला शाखेतून प्रथम आलेली कु. ऋतुजा सु. नन्नावरे कु.भारती नीलू नन्नावरे या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ , प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती चिटणीस सचिव यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातील विविध टप्पे सुरेखपणे पार पाडले. प्रा. निलेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.या सर्वसाधारण सभेला बहुसंख्य पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *