
अकोट शहर पोलीसांची हॉटेल व्यवसायीकावर कारवाई २८० किलो गोवंश जातीचे मासाची विक्री करीत असतांना तीन ईसम ताब्यात गोवंश मास व ईतर साहित्या सह एकुण ६१,५००/- रु मुद्देमाल जप्त
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
पोलीस स्टेशन अकोट शहर डी.बी.पथकाचे पोहेकॉ गणेश सोळंके यांना गुप्त माहीती मिळाली की, १) हॉटेल अलनुर हिवरखेड रोड २) हॉटेल K.G.N ३) हॉटेल अजमेरी नगरपरीषद समोर आठवडी बाजार आकोट येथे गोवंश मास भाजी करुन व्यवसाय करीत आहेत. अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि. जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह शिताफिने ईसम नामे १) ईलीयास खान समंदर खान वय ६३ वर्ष रा.अमिनपुरा अकोट २) शेख जमीर शेख उमर वय ५४ वर्ष रा. रामटेकपुरा अकोट ३) शहबाज खान वाजीद खान वय २९ वर्ष रा. अमिनपुरा अकोट हे त्यांचे हॉटेलमध्ये गोवंश जातीच्या जानावराचे मासचे टकडे बारीक करुन त्याची भाजी बनवुन व्यवसाय करीत असतांना मिळुन आले.आरोपी क्र १-३ यांचे ताब्यातुन एकुण वजन २८० किलो गोवंश मास किंमंत ५६,०००/-रु व ईतर साहीत्य किंमत ५,५००/- रु असा एकुण ६१,५००/- रु मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पञका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री.बी. चंद्रकांत रेड्डी सा.मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री निखील पाटील सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री किशोर जुनघरे, डी. बी. पथकाचे अंमलदार पोहेकॉ गणेश सोळंके, नापोकॉ विपुल सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे, पोकों अश्विन चौव्हाण यांनी केली.
