किंमत मूल्य : ₹४ वार शनिवार विद्यार्थ्यांच्या सन्मानात तथागत भाई आंभोरे मैदानात

किंमत मूल्य : ₹४ वार : शनिवार विद्यार्थ्यांच्या सन्मानात तथागत भाई आंभोरे मैदानात

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी

संग्रामपूर ITI महाविद्यालयासमोर एस.टी. बस थांबविण्याची मागणी मागणीची दखल न घेतल्यास ७ ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा संग्रामपूर : जळगाव जामोद ते वरवट बकाल या मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसेस संग्रामपूर येथील ITI महाविद्यालयाजवळ थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र समाजभूषण तथागत भाई आंभोरे यांनी आज संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांसाठी बस थांबा देण्याची मागणी केली.
संग्रामपूर ITI महाविद्यालयात विविध गावांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र बसेस महाविद्यालयाजवळ थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संग्रामपूर शहरातून ITI महाविद्यालयापर्यंत पायी जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाया जात असून त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ITI महाविद्यालयासमोर अधिकृत बस थांबा द्यावा
जळगाव जामोद–वरवट बकाल मार्गावरील संबंधित सर्व एस.टी. बसेसना संग्रामपूर ITI महाविद्यालयासमोर अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी या मागणीवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी. मागणीची दखल न घेतल्यास बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी संग्रामपूर ITI महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरूच राहणार!”
तथागत भाई आंभोरे महाराष्ट्र समाजभूषण संग्रामपूर, जि. बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *