जनावरांच्या पाण्यासाठी लाईनची ना दुरुस्ती डि पी, तात्काळ दुरुस्त करा, शेतकऱ्यांचे, आ. भावनाताई व महावितरणला निवेदन द्वारे मागणी

जनावरांच्या पाण्यासाठी लाईनची ना दुरुस्ती डि पी, तात्काळ दुरुस्त करा, शेतकऱ्यांचे, आ. भावनाताई व महावितरणला निवेदन द्वारे मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,५ :-मालेगाव तालुक्यातील झोडगा खुर्द येथील शेतकरी संजय श्रीराम सुरूशे हे मागील सतरा वर्षापासून मुक्या जनावरांना तसेच गावातील नागरिकांना आपल्या शेतातील बोरवेल वरून बांधलेल्या हौदात पाणी टाकून. पाणी देण्याची काम करत असताना त्यांनी घेतलेली लाईनची डीपी काही दिवसापासून बंद पडलेली असल्याने ही डीपी तात्काळ दुरुस्त करून द्यावी या संदर्भात विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांच्यासह, मिरगे साहेब उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी मालेगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मालेगाव येथे कार्यकारी अभियंता मिरगे साहेब यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले की मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बंद असलेली लाईन डीपी तात्काळ चालू करून द्यावे अशी मागणी केली असता मिरगे यांनी संबंधित लाईनमन यांना सांगून डीपी चालू करण्याचे सूचना दिल्या, निवेदन देतांना संजय श्रीराम सुरुशे, श्रीराम रघुजी सुरूशे सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव अमानी यांची उपस्थिती लाभली होती, आमदार भावनाताई गवळी यांच्या पीए परांडे यांनी सुद्धा कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीद्वारे डी पी , चालू करून देण्यासंदर्भात सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *