रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या ठाणे शहर संघटकपदी दाऊद शकील शेख यांची नियुक्ती..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या ठाणे शहर संघटकपदी दाऊद शकील शेख यांची नियुक्ती…युवक आघाडीच्या माध्यमातून पक्ष विस्ताराची जबाबदारी; दाऊद शकील शेख यांच्यावर नवी जबाबदारी…

ठाणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर तायडे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या ठाणे शहर संघटकपदी दाऊद शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशा नुसार व युवा ठाणे शहर अध्यक्ष विनोद भालेराव यानी नियुक्ति करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या युवक आघाडीच्या माध्यमातून ठाणे शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची जबाबदारी आता दाऊद शकील शेख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. युवकांना मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित व्यापक रिपब्लिकन पक्ष उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडी, ठाणे शहर यांच्या संघटनात्मक वाटचालीला आता नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने दाऊद शकील शेख यांची ठाणे शहर संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले असून, पक्षाच्या युवक आघाडी मध्ये संघटनात्मक काम करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या युवक आघाडीच्या माध्यमातून ठाणे शहरात संघटन विस्ताराला गती देण्याची तयारी सुरू झाली असून, दाऊद शकील शेख यांच्यावर सोपवण्यात आलेली नवी जबाबदारी ते कशा पद्धतीने पार पाडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *