शेतकऱ्यांना दुष्काळी मदत, पण शेतमजुरांचं काय

शेतकऱ्यांना दुष्काळी मदत, पण शेतमजुरांचं काय

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

दुष्काळात महिलांच्या हाताला काम नाही हप्ते भरणे झाले कठीण कर्जदार महिला अडचणीत राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र शेतीवर रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे.दुष्काळामुळे शेतीतील कामे मोठ्या प्रमाणात घटली आहेत.त्यामुळे शेतमजूर,महिला मजूर आणि ग्रामीण भागातील रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे.उत्पन्नाचे साधन कमी झाल्याने घरखर्च,मुलांचे शिक्षण,औषधोपचार तसेच कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोजगाराचा मार्ग बंद मग कर्जाचा हप्ता कसा भरायचा अनेक महिला व ग्रामीण कुटुंबांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे.नियमित रोजगार नसल्याने साप्ताहिक किंवा मासिक हप्ते भरणे अडचणीचे ठरत आहे.त्यामुळे दुष्काळाच्या काळात अशा कर्जदारांना काही काळ हप्ते भरण्यासाठी सवलत किंवा पुनर्नियोजन देण्याची मागणी होत आहे.सरकारने रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा
दुष्काळात केवळ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत नाही.तर शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावरही थेट परिणाम होतो.त्यामुळे शासनाने मनरेगा व इतर रोजगाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध करून देण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळणे महत्त्वाचे आहेच मात्र शेतमजूर आणि रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांसाठी रोजगार व कर्जहप्त्यांबाबतही ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे.प्रश्न एकच दुष्काळात शेतकऱ्यांना मदत मिळणार,मग शेतमजुरांच्या हाताला काम कधी मिळणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *