
अमृता खवले प्रस्तुत भीमा तुझ्या जन्मामुळे या चित्रपटाच्या पोस्टरचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
महाराष्ट्रातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असणाऱ्या चित्रपटापैकीच एक म्हणजेच भीमा तुझ्या जन्मामुळे या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन रविवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२६ रोजी स्थानिक सूर्या हॉटेल व गार्डन अकोट या ठिकाणी करण्यात आले.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नवनीत लखोटिया,स्वागताध्यक्ष म्हणून मंगेश चिखले व उद्घाटक म्हणून सुभाष तेलगोटे,पत्रकार किरण भडंग,निर्मात्या सौ.अमृता संतोष खवले,गुप्ताजी यांची उपस्थिती लाभली.तसेच चित्रपटातील मुख्यनायीका स्टेफी प्यारेजी आणि सहनायिका कुमुद मधापुरे ह्या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक ऍड.संतोष खवले यांनी आपल्या प्रास्ताविकात या चित्रपटाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिले.व त्यानंतर मंगेश चिखले यांनी या चित्रपटाचा संपूर्ण आढावा आपल्या भाषणातून घेतला.सुभाष तेलगोटे यांनी आपल्या भाषणामध्ये निर्माता व दिग्दर्शक यांच्यासह कलाकारांना शुभेच्छा दिल्या तर पत्रकार किरण भडंग यांनी आपल्या भाषणातून मराठी चित्रपटाला कमी थेटर मिळतात हि खंत व्यक्त केली व चित्रपटगृह संपण्याच्या मार्गावर आहेत.त्यासाठी उपाययोजना शासनाने काढावी व मराठी चित्रपटाला थेटर मिळावेत अशी आशा व्यक्त केली.तर नवनीत लखोटिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भीमा तुझ्या जन्मामुळे या चित्रपटाचा संपूर्ण आढावा घेत दिग्दर्शक ऍड संतोष खवले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.व त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर संपूर्ण आकोट तालुक्यातून आलेल्या भीम सैनिकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यामध्ये शुभम अवघड,सागर वाघ,राजू रायबोले,गजानन कौलखेडे,रवींद्र ओवे,बाळकृष्ण धांडे,सुनील तेलगोटे,संदीप सपकाळ,जगदेव खंडारे,बापूराव नितोने,प्रज्वल धांडे,सुजाता धुंदे,राजू तायडे,शैलेश धांडे,रामराव गवळी,विजय मोहोळ,रवी वानखडे,योगेश गवई,अजय आग्रे,प्रमिला सोनवणे,विकास धांडे,निलेश धांडे,दादाराव घनबहादूर,दशरथ वानखडे,दिनेश वानखडे,सुधाकर घनबहादूर,निखिल वानखडे,राक्षसकर साहेब,संदिप तायडे यांचा समावेश होता.कार्यक्रमाला पत्रकार राहुल कुलट,देवानंद खिरकर,संतोष विनके,अहमद शेख यांची देखील प्रमुख उपस्तीथी लाभली होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश वाघमारे, सागर वाघमारे,महेश वाघ अपेक्षा अवंडकर विकास घणबहादूर, सविता पटेल, दीपिका भगत, राहुल खिरकर, पवन मोरे, संतोष कळसकार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता सुपडकर ( काळे )यांनी तर आभार प्रदर्शन वंश दांदळे यांनी केले.
