क्रीडासंकुलाची दुरवस्था खेळाडूंना मूलभूत सुविधांचा अभाव मैदानात मोठे खड्डे

क्रीडासंकुलाची दुरवस्था; खेळाडूंना मूलभूत सुविधांचा अभाव मैदानात मोठे खड्डे, मातीचे ढिगारे व पाण्याचा निचरा नसल्याने खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न

नांदुरा तालुका प्रतिनिधी : (संदेश पहुरकर)

नांदुरा शहरातील तालुका क्रीडा संकुल, नांदुरा येथील क्रीडांगणाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, खेळाडूंना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.क्रीडांगण परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे व चर खोदण्यात आले असून, मातीचे मोठे ढिगारे पडलेले आहेत. मैदानात गवत वाढले असून काही भागात पाण्याचा योग्य निचरा होत

नसल्याचेही दिसून येते. अशा परिस्थितीत सराव करणाऱ्या खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून विविध योजना व निधी उपलब्ध करून दिला जात असताना, प्रत्यक्षात क्रीडासंकुलाची अशी अवस्था असणे ही गंभीर बाब आहे. खेळाडूंना सुरक्षित व दर्जेदार मैदान, स्वच्छ परिसर, योग्य ड्रेनेज आणि आवश्यक मूलभूत

सुविधा मिळणे गरजेचे आहे.त्यामुळे संबंधित क्रीडा विभाग व प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने पाहणी करून क्रीडांगणाची दुरुस्ती, खड्डे व चर बुजविणे, मातीचे ढिगारे हटविणे, गवताची साफसफाई तसेच पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.खेळाडूंच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन क्रीडासंकुल पूर्ववत व खेळण्यायोग्य करावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *