जळगाव जामोद शहरासह १४० गावांचा पाणीपुरवठा २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान बंद

जळगाव जामोद शहरासह १४० गावांचा पाणीपुरवठा २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान बंद

जळगाव जामोद प्रतिनिधी :

जळगाव जामोद शहरासह परिसरातील १४० गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बंद राहणार आहे. मुख्य गुरुत्ववाहिनीची दुरुस्ती तसेच एअर व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयाकडून २३ ऑक्टोबर रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व सचिवांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीअंतर्गत मुख्य गुरुत्ववाहिनीची दुरुस्ती आणि एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर नळधारक व नागरिकांना वेळेत सूचना द्याव्यात, असे निर्देश उपविभागीय अधिकारी इंद्रल राठोड यांनी दिले आहेत. तसेच संबंधित प्रशासकीय विभागांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने जळगाव जामोद शहरासह संबंधित गावांतील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *