बाप्पांचं स्वागत खड्ड्यातून?नाशिक गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना

बाप्पांचं स्वागत खड्ड्यातून?नाशिक : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना

नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. विकासकामे होणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे; मात्र ही कामे योग्य नियोजन आणि वेळेच्या चौकटीत पूर्ण झाली नाहीत, तर त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.गणरायाच्या आगमनाची तयारी शहरभर सुरू असताना अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते, खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतुकीची कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गणेश मंडळे, भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.रस्त्यांचे काम करायचे असेल तर ते वेळेत

आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. एकीकडे शहर सुशोभीकरणावर भर दिला जात असताना दुसरीकडे मुख्य रस्त्यांची अशी अवस्था राहणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे.गणरायाचे स्वागत फुलांनी, रोषणाईने आणि भक्तिभावाने व्हावे; खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीने नव्हे.संबंधित प्रशासनाने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देऊन गणेशोत्सवापूर्वी शक्य तितकी कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी.विकासकामांना विरोध नाही; मात्र विकासकामांचा त्रास नागरिकांना किती काळ सहन करावा लागणार, हा प्रश्न नक्कीच आहे.— जय जोशी, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *