चर्मकार समाजाच्या राखीव भूखंडावर अतिक्रमणाचा आरोप,प्रशासन गप्प

चर्मकार समाजाच्या राखीव भूखंडावर अतिक्रमणाचा आरोप,प्रशासन गप्प शीट क्र. १९, डी प्लॉट क्र. २२ चा प्रश्न ऐरणीवर,कारवाई करण्याची संत रविदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्थेची मागणी

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट चर्मकार समाजासाठी राखीव असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या शीट क्रमांक १९, डी प्लॉट क्रमांक २२ या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप संत रविदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्थेचे वतीने बिंदेश राजदे प्रकाश बेहतरे विजय राजदे विजय बेहतरे रा मोची पुरा नरसिंग रोड अकोट यांनी केला आहे. या प्रकरणामुळे राखीव भूखंडाच्या संरक्षणाचा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.संस्थेच्या तक्रारीनुसार, संबंधित जागेचा महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.मात्र, पंचनामा झाल्यानंतरही धर्मराज मंडलेकर व श्रावण मंडलेकर यांच्याकडून कथित अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.धर्मराज मंडलेकर यांच्याकडे संबंधित भूखंडाबाबत वैध महसुली पुरावा नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. तसेच, अकोट नगरपालिकेकडून या प्रकरणात ठोस कार्यवाही केली जात नसल्याचे आणि समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.महसुली पंचनामा झाल्यानंतरही कथित अतिक्रमणाचा प्रश्न कायम असेल तर संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. भूखंडाची अधिकृत मालकी व आरक्षणाची कागदपत्रे तपासून निष्पक्ष चौकशी करावी, कथित अतिक्रमणाची पडताळणी करावी आणि नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी संस्थेने केली आहे.या प्रकरणात महसूल विभाग आणि अकोट नगरपालिकेने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *