
सेंट पॉल्स अकॅडमीच्या बेसबॉल संघांची विभागीय स्तरावर धडक!
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये सेंट पॉल्स अकॅडमीच्या मुलांच्या आणि मुलींच्या बेसबॉल संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या आणि १४ वर्षांखालील मुलींच्या संघांनी मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात मानाची भर पडली आहे.जिल्हास्तरीय डीएसओ शालेय बेसबॉल स्पर्धा दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, हिंगणा-म्हैसपूर, गीतानगर, अकोला येथे पार पडल्या. या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या १४ वर्षांखालील मुलींच्या बेसबॉल संघाने दिनांक २१ ऑक्टोबर रोजी, तर १७ वर्षांखालील मुलांच्या बेसबॉल संघाने दिनांक २२ ऑक्टोबर रोजी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.दोन्ही संघांनी आपल्या खेळातील कौशल्य, जिद्द, शिस्त आणि सांघिक भावनेच्या जोरावर हे यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, आगामी विभागीय स्पर्धांमध्येही दोन्ही संघ उज्ज्वल कामगिरी करून शाळेचा नावलौकिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लूनकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, शारदा लखोटिया, रेखा चांडक, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, प्रभुदासजी नाथे, पर्यवेक्षक नितीन गावंडे, मालती महल्ले, सुचिता गायकवाड, वैशाली गावत्रे तसेच शिक्षकवृंदाने दोन्ही यशस्वी संघांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.या यशस्वी कामगिरीसाठी क्रीडा शिक्षक अभिलाष काळमेघ, प्रणव देंडव, नारायण वानखडे, संगीता सुरळकर, सुजल काळबोंडे आणि स्नेहा टोबरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खेळातील कौशल्य विकसित करण्याची आणि यशाची नवी शिखरे गाठण्याची प्रेरणा मिळाली.सेंट पॉल्स अकॅडमीच्या दोन्ही बेसबॉल संघांच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, विभागीय स्तरावरील आगामी स्पर्धांसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
