महावितरणच्या विविध समस्या विरोधात शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांना त्रास द्याल तर खपवुन घेणार नाही अक्षय पाटील यांचा इशारा.

महावितरणच्या विविध समस्या विरोधात शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांना त्रास द्याल तर खपवुन घेणार नाही अक्षय पाटील यांचा इशारा.

जळगाव (जा.):- प्रतिनिधी सुरेंद्र गवई

खरंतर पावसाने जेमतेम दीड महिन्याचा खंड टाकल्याने शेतकऱ्यांची पिके पूर्णतः सुकत आहे. ज्या शेतकऱ्याकडे विहीर,बोर किंवा इतर सिंचनाची साधने आहे त्यांना मात्र महावितरणच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.महावितरणच्या विविध समस्या विरोधात बोराळा,उटी निंभोरा बु.,भेंडवळ बु.,हिंगणा मानकर,खांडवी या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत उपकार्यकारी अभियंता चौबारावाला साहेब यांच्याकडे विविध समस्यांचा पाढाच वाचला.यामध्ये प्रामुख्याने महावितरण कडून नेहमी करता होत असलेले वेळेचे बदल, वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होणे, अनेक ठिकाणी पडलेले पोल उभे करून दुरुस्ती करणे, ज्या ट्रांसफार्मर लोड येत आहे अशा ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर देणे या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची चर्चा केली.या चर्चेदरम्यान अनेक ठिकाणी त्वरीत होणारे कामे अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे न होतांनी दिसत असल्याने अक्षय पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत अधीक्षक अभियंता बुलढाणा यांच्याशी फोनवर चर्चा केली असुन तालुक्यात शेतकऱ्यांना होत सर्व प्रकार सांगितला तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न महावितरणे सोडवावेत व काही अधिकारी शेतकऱ्यांशी मनमानीने वागत असतील तर त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वरिष्ठांच्या चर्चेदरम्यान देण्यात आला.यावेळी विविध गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *