अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहारा ग्रुप कटिबद्ध सहारा मल्टिपर्पज सोसायटी ग्रुपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहारा ग्रुप कटिबद्ध सहारा मल्टिपर्पज सोसायटी ग्रुपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट सहारा मल्टिपर्पज सोसायटी ग्रुपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून,कदीर शाह यांची अध्यक्षपदी,रमजान शाह यांची सचिवपदी,अथर हुसेन यांची उपाध्यक्षपदी,कालूभाई यांची कोषाध्यक्षपदी,असरार भाई समी जामदार यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अल्पसंख्याक समाजाचे हित आणि कल्याण साधणे,समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे सहारा ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.अल्पसंख्याक समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास त्याविरोधात ठामपणे आवाज उठवून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सहारा ग्रुप सदैव तत्पर राहील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.यासोबतच हिंदू-मुस्लिम समाजामध्ये सामाजिक सलोखा,बंधुभाव आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.सामाजिक एकता अधिक दृढ करून समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या हरिभाऊ वाघोडे आणि माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ वाघोडे यांच्या हस्ते सहारा मल्टिपर्पज सोसायटी ग्रुपच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संध्या वाघोडे आणि हरिभाऊ वाघोडे यांनी सहारा ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्याला अधिक गती मिळेल.तसेच समाजाची शैक्षणिक प्रगती,उन्नती आणि कल्याणासाठी प्रभावीपणे कार्य केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *