दोन डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन नाकारला

दोन डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन नाकारला

जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील अवैध वैद्यकीय व्यवसायप्रकरणी विजय मनोहर ताडे आणि सुब्रतो सुबोध सरकार या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम.पाटील यांनी दि.२२ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला.विजय मनोहर ताडे (वय ४८) आणि सुब्रतो सुबोध सरकार (वय ५५) यांच्याविरुद्ध अवैध वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी अकोट शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणांत दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाना विरोध करत युक्तिवाद केला.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विजय ताडे आणि सुब्रतो सरकार या दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले.या निर्णयामुळे अकोट तालुक्यातील कथित अवैध वैद्यकीय व्यवसायाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या प्रकरणांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *