नरनाळा किल्ल्यावर भक्तीमय वातावरणात वार्षिक ऊर्स साजरे

नरनाळा किल्ल्यावर भक्तीमय वातावरणात वार्षिक ऊर्स साजरे

देवानंद खिरकार अकोला जिल्हा प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही नरनाळा किल्ल्यावर स्थित हजरत बुरहानुद्दीन अवलिया (रह अलै)(कुत्तर देवता) यांचा वार्षिक उर्स मोठ्या भक्तिभावाने व शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.हजरत बुरहानुद्दीन अवलिया (रह अलै) कब्रस्तान व उर्स निगरा कमिटी,नरनाळा किल्ला यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने दरवर्षी हा उर्स आयोजित केला जातो.निगरा कमिटीचे अध्यक्ष मो.साबीर जमादार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उर्साची सुरुवात किल्ल्यावरील मशिदीत जोहरची नमाज जमातने अदा करण्यात आली.त्यानंतर कुरआनखानी व फातेहाखानी करण्यात आली.यानंतर उपस्थित अकीदतमंदांच्या उपस्थितीत हजरत बुरहानुद्दीन अवलिया व इतर अवलिया-ए-इकराम यांच्या कबरींवर चादर चढविण्यात आली.तसेच दुरूद-ए-पाकचे नजराणे पेश करण्यात आले.यावेळी निगरा कमिटीचे उपाध्यक्ष हाजी अफजल खान,सचिव मोहम्मद नदीम शेखू,सैय्यद रफत अली सेठ,सैय्यद यावर अली,अ.रऊफ पहलवान,अ.तौहिद मौलाना,कदीर शाह ठेकेदार,वसीम अहमद खान यांच्यासह इतर ट्रस्टी उपस्थित होते.उर्साच्या आयोजनासाठी वन विभागाकडून उर्स कमिटीला भरपूर सहकार्य मिळाले.वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक राहुल टोलीया सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहनूर बिटचे आर.एफ.ओ.दिनेश नंदेशवार तसेच जया बगडे मॅडम आपल्या पथकासह उपस्थित होते.या उर्साला शेकडो अकीदतमंदांनी उपस्थिती लावली.उर्स शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल तसेच वन विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *