
यंत्रयुगात बैलांची संख्या घटली बैलपोळ्याच्या तोंडावर मातीच्या बैलांना मागणी वाढली
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट वैज्ञानिक युगात शेतीच्या कामासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे महत्त्व हळूहळू कमी झाले आहे.परिणामी ग्रामीण भागात बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना दिसत आहे.मात्र बैलपोळ्याच्या पारंपरिक सणाची आठवण आणि ग्रामीण संस्कृतीची नाळ जपण्यासाठी मातीच्या बैलांना आजही विशेष महत्त्व दिल्या जात आहे.बैलपोळा सणाच्या तोंडावर बाजारपेठेत विविध आकार व आकर्षक रंगांनी सजवलेले मातीचे बैल विक्रीसाठी दाखल झाले असून या पारंपरिक मातीच्या बैलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.कुंभारांनी मेहनतीने तयार केलेल्या या मातीच्या बैलांना सध्या बाजारात चांगली मागणी दिसून येत आहे.पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलांच्या मदतीने केली जात होती.नांगरणीपासून ते वाहतुकीपर्यंत बैल हा शेतकऱ्याचा जिवाभावाचा साथीदार होता.मात्र मातीच्या बैलांच्या माध्यमातून हीच ग्रामीण संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारात आलेले हे मातीचे बैल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरत असून बदलत्या काळातही ग्रामीण परंपरेचे दर्शन घडवत आहेत.ट्रॅक्टर,रोटाव्हेटर आणि इतर आधुनिक यंत्रांमुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात होऊ लागली.त्यामुळे बैल पाळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.बैलांची संख्या कमी झाली असली तरी बैलपोळ्याची परंपरा आणि बैलांप्रती असलेली कृतज्ञता आजही कायम आहे.
बॉक्स
मातीच्या बैलांच्या माध्यमातून हीच ग्रामीण संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.बैलपोळ्याच्या निमित्ताने बाजारात आलेले हे मातीचे बैल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरत असून, बदलत्या काळातही ग्रामीण परंपरेचे दर्शन घडवत आहेत
प्रतिक्रिया
यावर्षी मातीच्या बैलांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.200,300,500,रुपया पर्यंत बैल जोडी विकल्या जात आहे.
महादेव मदनकार बोर्डी
