श्री क्षेत्र श्रद्धा सागर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न

श्री क्षेत्र श्रद्धा सागर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकार

आकोट संपूर्ण वर्षभर विविध देव संतांच्या जयंती व पुण्यतिथी उत्सवांचे आयोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रध्दा सागर, आकोट द्वारा घेण्यात आला आहे. यामध्ये वारकरी संप्रदायामधील महान संत श्री सेना महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रमांनी दि. ०८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने पहाटे श्रींचा अभिषेक होऊन सकाळी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील उपशाखा श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर आकोटच्या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी विधिवत गाथा भजन केले. यामध्ये विविध संतांसह श्री संत सेना महाराजांच्या अभंगाचे सुद्धा भजन करण्यात आले. यानंतर पूजन सोहळा व आरती संपन्न झाली. तदनंतर बालवैष्णवांसह उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.प्रस्तुत कार्यक्रमाकरिता श्री संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर, व्यवस्थापक अमोल मानकर, दिलीप कुलट, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक राम महाराज गाढे, त्याचप्रमाणे बाळकृष्ण वाकोडे व वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *