
आमदार झनक यांच्या तात्काळ प्रयत्नांमुळे नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणार.
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
,ता.९तालुक्यातील मौजे कळंबेश्वर येथील शेतकऱ्याच्या शेतातील उभी पिके पावसाच्या दीर्घ विश्रांतीने संकटात सापडली आहेत.पीक पाण्या अभावी कोमेजू नये, म्हणून शेतकरी पाणी देण्यासाठी शेतात जातात, परंतु शेतात वीज पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना पाणी पुरवठा असूनही पाणी देणे अशक्य झाले आहे.शेतकऱ्यांची ही ज्वलंत समस्या आमदार अमित झनक यांनी ऐकून विज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांना शेती पंपांसाठी होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्येची दखल आमदार झनक यांनी तातडीने घेतली असून, नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर, व आवश्यक विद्युत वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडे शिफारस केली आहे. संबंधित विभागाकडून तात्काळ तांत्रिक पाहणी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश पायरू अवचार, यांच्या पुढाकाराने शिवदास तांबेकर, नामदेव गव्हांदे, सुरेश अवचार, शोभा बोराटे, देविदास वानखेडे, राजेश बोराटे, प्रकाश चतरकर, यशवंत पठाडे, शंकर बोरचाटे, दाजिबा अवचार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
