
पावसाच्या दीर्घ खंडा मुळे खरीप पिके संकटात; तातडीने मदतीची मागणी.
वाशिम जिव्हा प्रतीनीधी अनिल जाधव
ता.९मालेगाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील पिकांची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश अवचार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
तहसीलदार, मालेगाव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यात सोयाबीन, तूर, कापूस यांसह विविध खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला असून पिकांचे नुकसान झाल्यास त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.तेव्हा प्रभावित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून गावनिहाय पंचनामे करावेत, पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा आणि परिस्थितीनुसार दुष्काळसदृश उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश अवचार, नामदेव गव्हांदे, दाजिबा अवचार, राजेश बोरचाटे, आनंदा ठेकेदार, रामदास गव्हानंदे, राहुल अवचार, नारायण गव्हानंदे, सुरेश अवचार, सुरेश प्रभू, दीपक अवचार, दीपक गव्हानंदे, राजेंद्र अवचार, महादू अवचार, सुभाष गव्हानंदे आणि दत्ता पडघान यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
