
महाराजस्व अभियान शिबिरातील जनतेचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी !( जाधव सामाजिक कार्यकर्ते)
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)
दि,५ :-शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन शासन आपल्या दारी या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान शिबिरे तालुक्यातील महसूल मंडळासह तहसील कार्यालयात राबविण्यात आली होती,आयोजित करण्यात आली होती परंतु अद्याप शेतकरयांनसह , विविध क्षेत्रांतील योजनेची लाभार्थ्यांनी केलेल्या अर्जाची, फाईल देण्यात आलेल्या प्रकरणा चां मात्र निपटारा झाला नसल्याचे चित्र दिसत असून या बाबत तहसील अंतर्गत संबंधित विभागात लाभार्थी चक्कारा मारतांना दिसत आहेत, तेंव्हा या बाबीची दखल घेऊन तहसीलदारांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे, मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनी कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, या सह श्रावण बाळ योजना, निराधार योजना, अपंग, विधवा महिलांसाठी मिळणारं अनुदान साठी फाईल जमा केली असता या पात्र लाभार्थींना रिसोड तहसील कार्यालयात महाराज्यस्व अभियान शिबिरात सहभागी होण्यासाठी बोलविले होते, परंतु अद्याप ही या मधिल बरेच लाभार्थींची प्रकरणे निकाली काढण्यात आली नसल्याने हे शासनाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या मुळे यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी तहसीलदारांकडे केली आहे
