स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७, माझी वसुंधरा अभियान

स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७, माझी वसुंधरा अभियान

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७, माझी वसुंधरा अभियान ७.० तसेच पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने नगर परिषद अकोटच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी ‘पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत नागरिकांना शाडू वा नैसर्गिक मातीची मूर्ती वापरणे,घरच्या घरी निर्माल्य व फुलांचे कंपोस्टिंग करणे, सिंगल युज प्लास्टिक टाळून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंनी सजावट करणे,विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करणे,ओला-सुका कचरा विलगीकरण करून घंटागाडीला देणे, एलईडी किंवा सौरउर्जेचा वापर करून वीज वाचवणे,घराच्या परिसरात झाड लावून त्याचे संगोपन करणे,सीड बॉल तयार करून नगर परिषदेत जमा करणे तसेच पर्यावरण विषयक ‘हरित शपथ (E-Pledge)’ घेऊन त्याचे प्रमाणपत्र जोडणे यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत. पूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु. २१,०००/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. ११,०००/- व तृतीय क्रमांकासाठी रु. ५,०००/- अशी आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेत सहभागासाठी दिनांक ०७/०९/२०२६ ते ११/०९/२०२६ दरम्यान नोंदणी करता येईल.सविस्तर नियम नगर परिषद कार्यालयात उपलब्ध असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी शशिकांत मारोती बाबर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *