शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे शिक्षकांचा सन्मान

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे गजाननराव निमकर्डे सर,जीवनसिंग चव्हाण सर,पद्माकर फुलारी सर,छाया मानकर मॅडम,नितीन गुहे सर या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाहीत, तर त्यांच्यात संस्कार,शिस्त,मूल्ये आणि आत्मविश्वास रुजवून देशाचे भावी नागरिक घडविण्याचे कार्य करतात. या कार्याचा गौरव म्हणून रोटरी क्लब ऑफ अकोटच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.नावेश मोहता,आय.पी.पी इंजि.रवि पवार,सचिव श्यामकुमार शर्मा,राजकुमार गांधी,कैलास साबळे,तसेच संदीप ढोक,विवेक रघुवंशी,अश्विन पितांबरवाले यांच्यासह रोटरी सदस्य व शिक्षकांची उपस्थिती होती.शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *