
जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर कराशेतकºयांना शासकीय मदत व पीकविमा देण्याची मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी : (अनिल जाधव)
दि,५:- वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात मागील २० ते २१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मालेगाव तालुका व वाशीम जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी विवेक गवळी यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमुद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत िपकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सोयाबीन, तूर व कापूस या प्रमुख पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्यावर दुबार पेरणी, मशागत व पीक संवर्धनाचा आर्थिक बोजा वाढला आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविमा मिळावा तसेच पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी. तसेच पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता मालेगाव तालुका व वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विवेक गवळी यांनी मालेगावचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
