भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2026 निमित्त संयुक्त नियोजन बैठक वाशीम येथे उत्साहात संपन्न…

भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव 2026 निमित्त संयुक्त नियोजन बैठक वाशीम येथे उत्साहात संपन्न

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,५:-बहुजनांचे हृदयसम्राट ऍड. श्रेध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वाशिम येथे दि. 26 आक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाची भव्य सभा होणार आहे.त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात हॉटेल इव्हेटो येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शिका म्हणुन
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीचे अध्यक्ष मा. सिद्धार्थ भगत (जिल्हाध्यक्ष भारतिय बौद्ध महासभा ) हे होते. प्रमुख उपस्थितीत मा. यु. जी. बोराडे(राज्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ), मा.अरुंधती शिरसाठ (केंद्रीय कार्यकारणी सदस्या),मा.कृष्णाभाऊ देशमुख (वंचित बहुजन आघाडी राज्यकार्यकारणी सदस्य ), मा. किरणताई गिऱ्हे (महिला राज्यकारणी सदस्या), पि. जे. वानखेडे (जिल्हाध्यक्ष भा. बौ. महासभा अकोला), मा. रंगनाथ धांडे (जिल्हा महासचिव ), मा.ज्योतीताई इंगळे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ), अनंत कुमार जुमडे (निवडणूक अधिकारी )
विभागीय संघपक संध्याताई पंडित, महिला जिल्हा अध्यक्ष मिनल बनसोड व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच भारतीय* बौद्ध महासभा समता सैनिक दल, महिला जिल्हा शाखा व तालुका शाखा व सर्व आघाडी,वंचित बहुजन आघाडी व सर्व आघाडी जिल्हा शाखा वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.बैठक नियोजन मा.कृष्णाभाऊ देशमुख ( महाराष्ट्र. राज्य कार्यकारिणी सदस्य)यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मुकुंद वानखडे जिल्हा कोषाध्यक्ष व सुत्रसंचलन देवानंद वाकोडे जिल्हा सरचिटणीस व कार्यक्रमाचे आभार शालिग्राम पठाडे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *