बाबाचा प्रकटदिन महोत्सव उत्साहात सुरू14 फेब्रुवारीला 31 क्विंटलचा महाप्रसादाचा आयोजन

शेलगाव ओंकारगीर येथे, बाबाचा प्रकटदिन महोत्सव उत्साहात सुरू14 फेब्रुवारीला 31 क्विंटलचा महाप्रसादाचा आयोजन

मालेगाव तालुका प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोदांडे येथे सन 1996 मध्ये परमपूज्य ओंकारगीर बाबा चा प्राण प्रतिष्ठान झाली होती तेव्हापासून येथे दरवर्षीप्रमाणे बाबांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन ओंकारगीर बाबांची जन्म भूमी शेलगाव ओंकारगीर व कर्मभूमी शिरपूर जैन आहे, शेलगाव येथे प्रगट दिनानिमित्त सात दिवस सप्ताह चालू असतांना दररोज संपूर्ण गाव चुलबंद जेवणासाठी मंदिर वर असतात व दररोजचे साप्ताहिक कार्यक्रम काकडा भजन व हरिपाठ नव्हते अकरा व रात्री कीर्तन होतात शेवटच्या दिवशी 14 फेब्रुवारीला भव्य दिव्य असे महाप्रसादाचा 31 क्विंटलाचा महाप्रसाद वाटप असतो, गावकऱ्यांच्या वतीने आयोजित ७ सात फेब्रुवारीला श्री समर्थ जानगीर महाराज संस्थान तीर्थक्षेत्र शिरपूर द्वारा संचालित प पू ओंकारगीर बाबा संस्थान शेलगाव ओंकारगीर येथे प्रगट दिन महोत्सवाला सुरुवात झाली असून 14 फेब्रुवारीला कार्यक्रमाची सांगता व भव्य दिव्य महाप्रसादाचा वाटप होणार आहे, चालू असलेल्या सप्ताह मध्ये कथेचे वाचन ह भ प गजानन महाराज वाझुळकर यांच्या वाणीतून होत असून, रोज रात्रीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध ह भ प कीर्तनकाराचे कीर्तनाचा कार्यक्रम होत असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात , 14 फेब्रुवारीला असलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकाच्या वतीने व समस्त गावकर च्या वतीने करण्यात आले आहे

One thought on “बाबाचा प्रकटदिन महोत्सव उत्साहात सुरू14 फेब्रुवारीला 31 क्विंटलचा महाप्रसादाचा आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *