
संजय गांधी निराधार योजनेचे DBT पोर्टल सुरू लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
वाशीम जिल्हा प्रतिनिधी दि,२:-(अनिल जाधव)
मालेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार विभागामार्फत शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात यामध्येच, ग्रामीण भागासह शहरी भागातील लोकांना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने पात्र असलेल्या लाभार्थीना योजनेचे अनुदान देण्यात येत असते, या योजनेचे DBT पोर्टल सुरू झाले असून ज्या लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले नाहीत, आधार संबंधी काही अडचणी असल्यास त्या संबंधित लाभार्थ्यांनी अपडेट आधार कार्ड,शेवटचे मिळालेल्या अनुदानाची एन्ट्री व आधारला लिंक असलेला मोबाईल घेऊन संजय गांधी निराधार विभाग तहसील कार्यालय मालेगाव येथे येवून आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे किंवा जे लाभार्थी काही कारणास्तव तहसीलला येवु शकत नाहीत अशा लाभार्थ्यांनी वर नमूद कागदपत्रे आणि मोबाईल आपल्या गावच्या संबंधित कोतवाल किंवा तलाठी यांच्या मार्फत पाठवण्यात यावे असे आवाहन मालेगाव तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे
