जोगवा.. जोगवा.. भवाणी मातेचा.परंपरा कायम, पध्दत नवीन

जोगवा.. जोगवा.. भवाणी मातेचा.परंपरा कायम, पध्दत नवीन

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

गेल्या हजारो वर्षापासुन सुरू झालेली जोगवा मागण्याची परंपरा ही आजही कायम असून काळानुरूप बदलत आहे.जोगवा जोगवा अंबाबाईचं, जोगवा जोगवा भवानी मातेचा असा गजर सध्या माता भवानी कमलेश्वरी देवीच्या मंदीर परिसरात व गावात ऐकायला मिळत आहे.
जोगवा मागणे ही जुनी परंपरा असून ती आजही ग्रामीण भागात. मोठ्या उत्साहात जोगवा मागून परंपरा कायम ठेवली आहे सकाळी व संध्याकाळी किन्हिराजा येथील भवानी माता कमलेश्वरी मंदिरात आरती झाल्यानंतर अनेक महिला कबूल केल्याप्रमाणे पदराची झोळी करून जोगवा जोगवा भवाणी मातेचा असे म्हणत सर्व मंदीर परीसरात फिरतात व जमा झालेले जोगव्याचे पैसे हे देवीच्या दाणपेटीत टाकतात तर गावात जावुन घरओघरी जावून जोगवा मागतात मीठा पिठाचा जोगवा आणा बाई लवकरी.. असे म्हणत जोगव्यात पैसे मागतात मिठाची पाशवी मागतात व पीठ मागतात मीठ पीठ व पैशाचा जमा झालेले हा जोगवा मंदीर परिसरात नेवून देवीच्या चरणी अर्पण करतात व किती वर्ष देवीचा जोगवा मागणार हे मंदिरात जावून संकल्प करतात व त्या नुसार दरवर्षी मीठा पिठाचा व पैश्याचा जोगवा मागतात ही परंपरा आजही ग्रामीण भागातील भवाणी कमलेश्वरी माता मंदिरात पहावयाला आजही मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *