
MESTA च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी संजय मगर तर अकोट तालुका उपाध्यक्ष पदी गजानन राऊत यांची नियुक्ती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आज अकोला येथील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे MESTA संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटक अनिल असलकर विदर्भ अध्यक्ष अभिजीत देशमुख तसेच विभागीय अध्यक्ष संतोष गडेकर अमरावती जिल्हाध्यक्ष लांडे उपस्थितीत पार पडली.यामध्ये जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी तसेच शिक्षक कार्यकारणी घोषित करण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वानुमते संजय मगर यांची MESTA च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संजय तायडे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या बैठकीत जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश गायकवाड,जिल्हा सचिवपदी दिवाकर कुकडे,तेल्हारा तालुकाध्यक्ष पदी शांतीलाल गोमासे,बाळापूर तालुकाध्यक्ष पदी अदनान परवेज यांची नियुक्ती करण्यात आली.आकोट तालुका कोषाध्यक्ष पदी रामदास मंगळे तसेच शरद फोकमारे यांची MESTA शिक्षक जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.तर महिला जिल्हाध्यक्षपदी चंचल चौरसिया यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीला अकोट तालुकाध्यक्ष नितीन झाडे,पातूर तालुकाध्यक्ष निलेश धरमकर,बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष डॉ.सुभाष गावंडे,बाळापूर येथील रजिक शेख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व संस्थाचालकउपस्थित होते.या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी तसेच जिल्हा शिक्षक कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल.
