
भूमी फाउंडेशनच्या गरबा महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! भक्तिमय वातावरणात नवव्या वर्षाचा उत्सव,लाखो रुपयांच्या बक्षिसांचे वितरण,विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा सन्मान
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भूमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य गरबा महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या महोत्सवाच्या नवव्या वर्षात भक्ती, संस्कृती, उत्साह आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विनामूल्य प्रवेश, लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आकर्षण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा महोत्सव विशेष आकर्षण ठरला.महोत्सवात गरबा स्पर्धेतील विजेत्यांना दास मोबाईलच्या वतीने विविध आकर्षक बक्षिसांसह चांदीच्या प्रतिमा प्रदान करण्यात आल्या. यावेळी अकोटमधील प्रसिद्ध रील स्टार्स, गरबा स्पर्धेचे परीक्षक तसेच भूमी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गटाचे) उपनेते गोपीकिशन बाजोरिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला ग्रामीण जिल्हा संघचालक मोहनराव आसलकर, दास मोबाईलचे संचालक रितेशजी मिर्झापुरे, वास्तुशिल्पकार नवनीत सेठ लखोटिया,जयपूर साडी सेल चे संचालक सचिन भुस्कट,प्रमोद चांडक,अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकृष्ण गुट्टे, डॉ.दिनेश नागमते, छावा संघटनेचे शंकरराव वाकोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस नेते प्रशांत पाचडे, ब्युटीशियन सागर गवळी, ‘सत्याचा लढा’चे मुख्य संपादक सतीश बापू देशमुख,मंगेश चिखले,नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नयना विशाल इंगोले, दीपक बोडखे आणि डॉ. विशाल इंगोले,मिलिंद नितोने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चंचलताई पितांबरवाले यांच्या सामाजिक कार्यात खंबीर साथ देणाऱ्या श्रीमती मंगलाबाई पितांबरवाले यांचा विशेष गौरव करण्यात आला.यासोबतच अकोटमधील रील स्टार्स रेणुका उसरू, गायत्री पिपराळे, रुपेश इदौरे आणि आदित्य गोटवाल यांचा सन्मान करण्यात आला.गरबा स्पर्धेचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या स्मिता जीवानी, अविनाश अबुलकर आणि अनिकेत डोंगरदिवे यांचाही गौरव करण्यात आला.विविध गटांतील विजेत्यांचा गौरव
गरबा स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रुप, उत्कृष्ट जोडी आणि उत्कृष्ट गरबा खेळाडू अशा विविध गटांत स्पर्धकांनी आपली कला सादर केली. अनया मोरे, अनुष्का वर्मा, नवदुर्गा ग्रुप, डोडिया ग्रुप, आदिशक्ती ग्रुप, चोखलिया ग्रुप, प्रेरणा मोरे आणि अलका टावरी यांच्यासह नमूद स्पर्धक व समूहांनी विविध गटांत विजेतेपद पटकावले.विजेत्यांना दास मोबाईलच्या वतीने आकर्षक बक्षिसे आणि चांदीच्या प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले.भूमी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देणारे अमोल पवार, जितेश गलाडे, सुमेध खडारे, स्मिता महल्ले, भावना रेवस्कर, सचिन वानखडे, प्रशांत बेराड, संदेश चौडेकर, शुभांगी बरेठिया, पूजा राठोड, अजय तेलगोटे, कीर्ती पितांबरवाले आणि गौतम मुळे यांचाही सत्कार करण्यात आला.नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक परंपरा जपत महिलांना एकत्र आणणे, स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव अकोटकरांसाठी संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया इंगोले यांनी केले तर भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चंचलताई पितांबरवाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
