हातातोंडाशी आलेला घास निसर्गांबरोबर अज्ञात व्यक्तीने हिरावून नेला

हातातोंडाशी आलेला घास निसर्गांबरोबर अज्ञात व्यक्तीने हिरावून नेला

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

कवठा बु.येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे असलेले कपाशी पीक अज्ञात व्यक्तीने उपटून टाकले अकोट तालुक्यातील कवठा बु.येथील शेतकरी रामेश्वर मरकाळे यांच्या शेतातील डौलदार उभे असलेले कपाशी पीक अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास उपटून टाकल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.येथील सावरगाव रोड लगत असलेल्या रामेश्वर मरकाळे यांच्या मालकीचे एकूण चार एकर शेतातील गट क्रमांक २४७ मधील अंदाजे अर्धा ते पाऊणे एकर शेतातील हिरवीगार उभे असलेले कपाशीचे झाडे पुर्णतः मुळासकट उपटून टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना शुक्रवार दि.१६/१०/२६ रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनात आली आहे. यामध्ये
सदर शेतकऱ्यांचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे जून महिन्यात चार एकर क्षेत्रफळावर मरकाळे या शेतकऱ्याने कपाशी पिकाची लागवड केली होती जेमतेम मोठ्या प्रमाणात बहरलेल्या पिकांची योग्य वेळी मशागत व कीटकनाशकांची फवारणी खतांची मात्रा योग्य वेळी दिल्याने दुष्काळी परिस्थितीत ही कपाशीचे पिक मोठ्या डौलाने उभं ठाकले होते यावर्षी पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यानंतरही सदर शेतकऱ्यांनी रात्र दिवस एक करून मोठ्या काबाडकष्टाने पिकाची मेहनत घेतली पीक फुलपात्यावर टपोर बोंडा ने भरलेल्या पराटीला अज्ञात माथेफिरू व्यक्तीने चार एकरावरील अंदाजे पाउन एकर क्षेत्रफळावरील कपाशी पीक उखडून उपटून टाकल्याची घटना दुर्देवी आहे एकीकडे शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सोय आहे अश्या शेतकऱ्यांनी रात्रंदिवस एक करून आपले पीक कसेबसे वाचवलं अशा परिस्थितीत काही अज्ञातांकडून कपाशी पीक उपटून फेकल्याने रामेश्वर मरकाळे नावाच्या शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे या संदर्भात येथील शेतकरी रामेश्वर मरकाळे यांनी अज्ञात व्यक्ती विषयी संताप व्यक्त करून अशा लोकांना कठोरात कठोर शासन व्हावे शिक्षा व्हावी सोबतच झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *