रोजगार मेळावेनोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे कौशल्य विकास विभागाचे आवाहन

रोजगार महाकुंभातून जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी२९ सप्टेंबरला जिल्ह्यात ९ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावेनोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे कौशल्य विकास विभागाचे आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

२ सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नऊ ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे मेळावे होणार आहेत.जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित या मेळाव्यांमध्ये विविध आस्थापनांमधील रिक्त पदांसाठी नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांना आस्थापनांशी थेट संवाद साधता येणार आहे.येथे होणार रोजगार मेळावे :वाशिम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरुळपीर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा येथील स्वातंत्र्यसैनिक श्री कन्हैयालालजी रामचंद्र इन्नानी महाविद्यालय, मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड येथील स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, मालेगाव येथील नाना मुंदडा विद्यालय, सावरगाव बर्डे येथील सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज, वाशिम येथील तुळशीरामजी जाधव कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि मंगरुळपीर येथील गुलशन ई गोहर सहारा विद्यालय येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती द्यावीया रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या व इतर आस्थापनांनी त्यांच्या उपलब्ध रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी. रिक्त पदांची माहिती washimrojgar@gmail.com या ई-मेलवर १० सप्टेंबर २०२६ पर्यंत पाठवावी, असे आवाहन प्रवीण वा. खंडारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांनी केले आहे.जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरी इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा तसेच विविध आस्थापनांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *