शेतकऱ्यांच्या शेतातील चोरी गेलेल्या अवजारे चा शोध घ्यावा

शेतकऱ्यांच्या शेतातील चोरी गेलेल्या अवजारे चा शोध घ्यावा!प्रदीप कुटे शिवसेना तालुकाप्रमुखांची ठाणेदाराकडे मागणी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,३१:-मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे शेत शिवारातील ७ ते ८ शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपाच्या केबल वायर, आणि सोलर अंटीना,सोलार केबलवायर,झटका मशीन,शेत अवजारे चोरिला आहे, या संदर्भात मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदारांना लेखी निवेदनाद्वारे चोरट्यांना पकडून चोरी गेलेल्या अवजारे शोध घ्यावा अशी मागणी मालेगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी केली आहे ,दि,३० आगस्ट च्या रात्री पांगरी कुटे येथिल शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी अवजारे चोरिला गेली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, करीता या चोरट्यांना पकडून शेतकरयांना त्यांच्या चोरी गेलेल्या वस्तू शोधून परत करण्याची मागणीही यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप कुटे यांच्या सह शिवसेना कार्यकर्ते व शेतकरी यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *