
अकोट मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार भारसाकळे यांची मंत्र्यांकडे निधीची मागणी
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. प्रकाश पाटील भारसाकळे यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री. आशिषजी शेलार यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात पत्र सादर केले.यावेळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.अकोट विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळावी, तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना प्राधान्याने निधी मंजूर व्हावा, यासाठी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी मंत्रिमहोदयांकडे पाठपुरावा केला.मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
