
माऊली महाविद्यालय, वाशीम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)-
स्थानिक माऊली महाविद्यालय, वाशीम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. इस्माइलखान पठाण हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. रवींद्र बुंधे हे होते.यावेळी प्रा. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या धम्मातून त्यांनी सर्वांना प्रज्ञा, शील, करुणा व सदाचाराचा मार्ग दाखवला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
