रन्नू रमजान रेघीवाले यांची परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी निवड.

रन्नू रमजान रेघीवाले यांची परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी निवड.

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील शिरपूर येथील गवळी समाजात जन्मलेल्या गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण रन्नू रमजान रेघीवाले याने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन केले आहे. त्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी (GMC Parbhani) येथे एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ​गवळी (मुस्लिम) समाजात जन्मलेल्या रन्नू रमजान रेघीवाले याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि कठोर परिश्रम घेत हे यश मिळवले आहे. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे संपूर्ण गवळी समाज, व रेघीवाले कुटुंब आणि शिरपूर परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​त्याच्या या यशाबद्दल चंदू रहेमान रेघीवाले, गफूर पिरू रेघीवाले, रन्नू पिरू रेघीवाले, भिका रन्नू रेघीवाले, हनीफ छोट्टू रेघीवाले, सलीम पिरू रेघीवाले, अकबर छोट्टू रेघीवाले, रमजान जंगली रेघीवाले, चंदू जंगली रेघीवाले यांच्यासह रेघीवाले कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी रन्नू रमजान रेघीवाले याचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आले. रन्नू रमजान रेघीवाले यांच्या या वैद्यकीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक व गवळी समाजातील व परिसरातील नागरिक व कुटुंबाकडून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.चौकट *उराशी बाळगलेले स्वप्न साकार होईल.*”रन्नूच्या या यशाने आज आमच्या संपूर्ण वर्षांनुवर्षांच्या कष्टाचं चीज झालं आहे. एक गरीब शेतकरी म्हणून शेतात राबताना मुलाला खूप शिकवावं आणि त्याने मोठं व्हावं, एवढंच स्वप्न आम्ही उराशी बाळगलं होतं. गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही रन्नूने कधीच जिद्द सोडली नाही; त्याच्या या कठोर परिश्रमामुळेच आज तो डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे.:- *(रमजान निन्नू रेघीवाले (वडील)*चौकट *समाजासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला, हा संपूर्ण रेघीवाले कुटुंबासाठी आणि गवळी समाजासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्याने भविष्यात एक उत्तम डॉक्टर बनून गोरगरीब आणि गरजू रुग्णांची निःस्वार्थ सेवा करावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.” *चांदबी जावेद भवानीवाले(आत्या,समाजसेविका मेडशी)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *