
अंबिका कावड मंडळाचे अमानीत शिवभक्त महीलांनी केले स्वागत
वाशीम जिल्हा (अनिल जाधव)
दि,३१:- दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र तापेश्रर संस्थान तपोवन येथे जाणाऱ्या कावड मंडळाचे अमानी येथे शिवभक्तासह महिलावर्गांनी पूजा आरती करून स्वागत केले, अमानी येथील अंबिका कावड मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लांबलाबुंन विविध धार्मिक क्षेत्रातील नदी ठिकाणांहून कावडद्वारे, पायदळ चालत पाणी आणून तपोवन येथे शिवमंदिरात वाहतात, यामध्ये शिवभक्त युवक मंडळी मोठ्या संख्येने सहभागी असतात, यावर्षी कन्हेरगांव नाका येथुन पाणी आणले होते,अमानी येथे या कावड मंडळाचे व रत्नेश्वर कावड इतर कावड मंडळाचे देखील महीला भगिनीने, पुजा आरती करून स्वागत केले, अमानी येथे गावातुन कावड मंडळ वाजत गाजत, भोलेनाथांचे गजर, भक्ती गीते म्हणून महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नंतर तपोवन कडे प्रस्थान झाले गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते
