बुलढाण्यात शिक्षक भारतीच्या यवतमाळ उर्दू टीमचे जंगी स्वागत

बुलढाण्यात शिक्षक भारतीच्या यवतमाळ उर्दू टीमचे जंगी स्वागत; शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेश देवकर यांचे मार्गदर्शन

बुलढाणा प्रतिनिधी राहुल चोपडे

:बुलढाणा येथे शुक्रवारी शिक्षक भारती, यवतमाळच्या उर्दू टीमच्या स्वागताचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. यवतमाळ येथून आलेल्या सर्व शिक्षक बांधवांचे शाल व हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला शिक्षक भारतीचे भावी आमदार सुरेश बाबुराव देवकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.यावेळी बुलढाणा जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अबूजैद अहमद सर, अमरावती विभागाचे अध्यक्ष शफी सर तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक भारतीची संपूर्ण टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शनकार्यक्रमादरम्यान सुरेश बाबुराव देवकर सर यांनी आगामी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षकांचे प्रश्न, हक्क आणि विविध मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षकांनी संघटित होणे आणि मजबूत नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी काळात शिक्षक भारतीची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.यवतमाळच्या उर्दू शिक्षक टीमच्या स्वागताच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून संघटनात्मक एकजुटीचा आणि आगामी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या तयारीचा नवा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षक बांधवांनी आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *