रोही आडवा आल्यानेराखी बांधायला निघालेले २ युवक गंभीर जख्मी

रोही आडवा आल्याने राखी बांधायला निघालेले २ युवक गंभीर जख्मी

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील किन्हिराजा शेलुबाजार कडून मालेगांव कडे जाणाऱ्या एम एच ३० ए सी ६५३१ या स्पेलेनडर प्लस या मोटरसायकल ला रोहीने जबरदस्त धडक दील्याने बार्शिटाकळी तालुक्यातील टीटवा येथील प्रसाद पांडे वय २५ व सुरेश वैरागडे वय २८ हे दो़घेही गंभीर झाले आहेत .
त्यांनी पुढील उपचारासाठी वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्नालयात उपचारासाठी पाठविणयात आले आहे .
टीटवा ये़थून प्रसाद गोपाल पांडे व सुरेश गजानन वैरागडे दो़घेही आज दुपारी अमानी कडे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जात होते किन्हिराजा पासुन मालेगाव कडे जात असतांना एका धाब्याजवळ त्यांच्या गाडीवर रोहीने उडी मारली त्यामुळे या मोटरसायकलवरील दोघेही रोडवर पडले यात प्रसाद पांडे यांच्या हाताला डोक्याला व सुरेश वैरागडे यांच्या पायाला हाताचा जबरदस्त मार लागला मालेगांव कडून गावाकडे येणारे डाॅ अजय गोंडाळ यांनी या दोन्ही गंभीर जख्मी धीर दिला व संजय वाघ या रिक्षा चालकाने व डाॅ गोंडाळ यांनी गंभीर जख्मीना किन्हिराजा येथील आरेाग्यवर्धीणी केंद्रात आणले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालय वाशीम येथे पुढील उपचारा साठी पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *