खैरखेड येथे अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेती,एस आर टी पद्धत आणि आय ओ टी तंत्रज्ञानाचे धडे

खैरखेड येथे अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेती,एस आर टी पद्धत आणि आय ओ टी तंत्रज्ञानाचे धडे

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथील ३९ विद्यार्थ्यांनी खैरखेड येथील शेतशिवाराला भेट देऊन नैसर्गिक शेती (ऑरगॅनिक फार्मिंग)एस.आर.टी.पद्धत आणि आधुनिक आयओटी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष धडे घेतले.या विशेष कृषी अभ्यास दौऱ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या प्रसंगी केशवराव मेतकर यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले.ऑरगॅनिक प्लांटेशनमध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे वेस्ट डी-कंपोजर, नॅचरल एन.पी.के.कवच,पत्थर का घोल,मायकोरायझाआणि ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची निर्मिती व त्यांच्या वापराबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.रासायनिक खतांना फाटा देऊन जमिनीची सुपीकता कशी टिकवावी, याचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवले.यासोबतच,कृषी क्षेत्रातील आधुनिकतेची जोड म्हणून श्री.बिजवे यांनी शेतीमधील आयओटी तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.सेन्सर्स आणि ऑटोमेशनच्या साहाय्याने पाणी व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज आणि पिकांची देखरेख कशी करावी हे त्यांनी स्पष्ट केले.प्रा.परीक्षित मेतकर यांनी विद्यार्थ्यांना डेअरी फार्मची सविस्तर माहिती देत दुग्ध व्यवसायातील विविध संधी व त्याचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी डेअरी बिझनेस हा एक महत्त्वपूर्ण आणि रोजगारनिर्मितीचा व्यवसाय कसा ठरू शकतो याबाबत मार्गदर्शन केले.या अभ्यास दौऱ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य मा.सुरेशदादा खोटरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एच.पांडे,मा.भालचंद्र फोकमारे,मा.संतोष सपकाळ,मा.कैलास मेतकर,मा.विजय मेतकर, मा.श्री रवींद्र मेतकर,मा.गोपाल मेतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांना या दौऱ्यात वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख व शाखा प्रमुख डॉ.एस.एन.पाटोळे,डॉ.एन.पी.देशमुख,डॉ.ए.बी.फोकमारे,डॉ.भरत नागरे, प्रा.कर्मा सोलकर,प्रा.खुशिया पाचडे, प्रा.शुभांगी देशमुख आणि प्रा.साक्षी मेतकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. आधुनिक आणि नैसर्गिक शेतीचा हा संगम अनुभवून महाविद्यालयाच्या ३९ विद्यार्थ्यांनी या भेटीचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *