शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वाशीम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव):

मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच रामगोपाल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विशेष म्हणजे दोन्ही शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून स्वत:च्या हाताने आकर्षक व सुंदर गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीची प्रक्रिया, शाडू मातीचे पर्यावरणीय महत्त्व तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक सुदर्शन ताजनेकर व पल्लवी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच वाशीम येथील मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाचे संचालक ललित राठी व शिक्षण तज्ञ सदस्य पंढरी उंडाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास मुंदडा, शिक्षिका सीमा राव,शिक्षक अमोल मुठाळ, शिक्षका दिपाली सरकटे व शिक्षिका संजीवनी सरकटे यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन तयार केलेल्या गणेशमूर्तींमधून त्यांची सर्जनशीलता, कलाकौशल्य आणि पर्यावरणाबद्दलची जागरूकता दिसून आली. शाडू मातीपासून गणेशमूर्ती निर्मितीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *