सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये रक्षाबंधन साजरा

सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये रक्षाबंधन साजरा

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

आकोट. स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज दि . 29/08/2026रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया , लूणकरण डागा ,प्रमोद चांडक, शारदा लखोटिया , रेखा चांडक, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे , उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी ,रिंकू अग्रवाल तसेच नितीन गावंडे, मालती महल्ले, सुचिता गायकवाड,वैशाली गावत्रे यांची मंचावर उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात नर्सरी ते के जी 2 पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमात नर्सरी ते केजी 2 सर्वप्रथम मुलींनी मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला .शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे सर यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगून रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात जपणारा सण आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच रिंकू मॅडम यांनी भाऊ बहिणीचे रक्षण कसे करते ही कथा सांगितली तसेच मुलींनी झाडाला राखी बांधून पर्यावरण आपले रक्षण कसे करतात हे रिंकू मॅडम यांनी समजावून सांगितले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रतीक्षा काळे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *